n-COVID१९ (करोना) हा एक श्वसन संस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. जरी डेंगी आणि चिकनगुनिया सारख्या रोगांचा प्रादुर्भाव डासांमुळे होत असला तरी करोनाचे विषाणू डासांमधून वाहून नेले जात नाहीत. करोनाबाधित व्यक्तीला चावलेल्या डासामुळे इतर व्यक्ती अथवा प्राण्याला करोनाचा प्रादुर्भाव होत नाही. करोनाचे विषाणू शेंम्बुड, लाळ आणि शिंकल्यानानंतर किंवा थुंकल्या नंतर हवेत उडालेल्या सूक्ष्म कणांमुळे पसरतात. डासांद्वारे या विषाणूंचा प्रसार होतो असे सिद्ध करणारा एकही पुरावा आजतागायत उपलब्ध नाही.
या रोगापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी करोनाबाधित व्यक्ती पासून ‘सामाजिक अंतर’ (अथवा ‘social distancing’) राखावे. ‘सामाजिक अंतर’ प्रस्थापित करणे म्हणजे करोनाबाधित किंवा कारोना संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्ती पासून सुरक्षित अंतर ठेवणे आणि अशा व्यक्तीशी जवळचा संबंध टाळणे. जागतिक आरोग्य संघटने- (World Health Organization) नुसार कारोना संसर्गाची सर्वसामान्य लक्षणे ताप, थकवा व कोरडा खोकला अशी आहेत.