एन-कोविड-१९ हे एक जीवास्त्र (बायोवेपन) का नाही?

कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाल्यापासून, हा व्हायरस प्रयोगशाळेत तयार झाल्याच्या अफवा पसरत आहेत. अमेरिकेतील काही जणांनी असा दावा केला आहे की हा व्हायरस वुहानमधल्या चतुर्थ स्तराच्या जैव सुरक्षा प्रयोगशाळेत (लेवल फोर बायोसेफ्टी लॅबमध्ये) तयार केला आहे. या लेवल फोर जैव सुरक्षा प्रयोगशाळांमध्ये शास्रज्ञ जगातील इबोलासारख्या घातक रोगजंतूंचा अभ्यास करतात. या प्रयोगशाळांच्या आराखड्यात उच्च दर्जाची सुरक्षितता असते. अशी प्रयोगशाळा वुहानमध्ये आहे म्हणून हा व्हायरस तिथे तयार केला गेला आहे हे सिद्ध होत नाही.

काही चीनी लोकांनी असा दावा केला आहे की अमेरिकी सैन्याने हा व्हायरस आणला आहे. पण शास्त्रज्ञांना असे लक्षात आले आहे की वटवाघळांना आणि खवल्या मांजरांना संसर्ग होणाऱ्या व्हायरसेसमध्ये आणि एन-कोविड-१९ व्हायरसमध्ये मनुष्याला संसर्ग होणाऱ्या व्हायरसेसपेक्षा जास्त साम्य आहे. एन-कोविड-१९ जर खरेच एक जीवास्त्र असते, तर ते माहिती असलेल्या मानवी शरीराला घातक असणाऱ्या एखाद्या व्हायरसपासून बनवले गेले असते. या व्हायरसची जनुकीय माहिती (आरएनए) वापरून शास्त्रज्ञांनी त्याची वंशावळ बनवली आहे. हा व्हायरस एका यजमानाकडून दुसऱ्याकडे (होस्ट टू होस्ट) जाताना त्याची जनुकीय माहिती कशी वाहिली जाते हे या वंशावळीतून आपल्याला समजते. यातून अशी माहिती समोर आली आहे की हा व्हायरस काही प्राण्यांमधून माणसांमध्ये आला.

जीवास्त्र म्हणजे काय?

जीवाणू आणि बुरशीसारख्या संसर्गजन्य जीवांपासून निघालेली विषद्रव्ये पूर्वी जीवास्त्र म्हणून वापरली गेली आहेत. लढाईमध्ये असे रोगजंतू मुद्दाम एखाद्याला किंवा शत्रू पक्षाच्या संपूर्ण जनतेला संसर्ग व्हावा म्हणून सोडले जायचे. उदाहरणार्थ, अँथ्रॅक्स रोग ज्या बॅक्टेरियामुळे होतो, तो बॅसिलस अँथ्रॅसिस जीवास्त्र म्हणून वापरला गेला होता.

 जीवास्त्र म्हणून वापरलेल्या रोगजंतूंमुळे प्राणघातक आजार होतात. एन-कोविड-१९ जरी गंभीर आजार असला, तरी यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. म्हणूनच एन-कोविड-१९ जीवास्त्र असल्याच्या दाव्याला पुराव्यांचा जवळपास काहीच आधार नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: