रोगप्रतिकारक शक्ती काय असते?

आपल्या शरीराने आजारांपासून आणि संसर्गजन्य आजार पसरवणाऱ्या जीवांपासून आपल्याला दिलेले संरक्षण म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. शरीराच्या पेशी आणि रेणू हे आपल्याला संरक्षण पुरवतात, ते एकत्रितपणे लढा देऊन बाहेरील जीव अथवा पदार्थाला शरीरात प्रवेश करण्यापासून थांबवतात. रोगप्रतिकारक पेशींवरील रेणू हे बाहेरून येणाऱ्या पदार्थांना घट्ट पकडून ठेवतात आणि त्यांचा संसर्ग होण्यापासून वाचवतात. अशी रोगप्रतिकारक क्षमता आपल्याला काही  आजारांपासून दीर्घकालीन संरक्षण सुद्धा पुरवते. पशुपक्षांमध्ये थोड्याफार प्रमाणात काही आजारांना लढा देण्याची रोगप्रतिकारक शक्ती असते.

आपल्या शरीरात विषाणूंविरूद्ध रोगप्रतिकारक शक्ती असते का ?

जेंव्हा विषाणूचा संसर्ग होतो तेंव्हा शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीच्या पेशी आणि प्रथिने (proteins) त्यांच्याशी लढा देतात आणि अधिक संसर्ग होण्यापासून थांबवतात. आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक पेशींवरील काही प्रथिने विषाणूंच्या आवरानावरील काही प्रथिनांना घट्ट पकडून ठेवतात आणि त्यांचा संसर्ग थांबवतात. परंतु विषाणू बऱ्याचदा रोगप्रतिकारक पेशींना टाळण्याचे अनेक मार्ग शोधून काढतात.

लसीकरण का गरजेचे आहे?

बऱ्याच वेळा एखाद्या विशिष्ट आजाराच्या विरुद्ध आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी लसीकरण केले जाते. एखादा संसर्गजन्य विषाणू हा कमकुवत केला जातो कि जेणेकरून तो आजार पसरवू शकणार नाही. असे कमकुवत विषाणू किंवा विषाणूंचे काही भाग (तुकडे) लस म्हणून आपल्या शरीरात टोचले जातात. अशा लसी आपल्या रोगप्रतिकारक पेशींना उत्तेजित करतात जेणेकरून आपल्याला त्या विषाणूंपासून संरक्षण प्राप्त होते. एखाद्या विषाणूचे लसीकरण हे फक्त त्या ठराविक विषाणूच्या विरुद्ध आपल्याला संरक्षण पुरवते. अशा लसणीची काही उदाहरणे म्हणजे गोवर व कांजीण्या.  

आपली रोगप्रतिकारक क्षमता ही (nCOVID १९) करोना विरुद्ध लढा देण्यासाठी पूर्णपणे तयार नाही आणि आजतागायत कोणतीही लस करोनासाठी उपलब्ध नाही.  करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ‘सामाजिक अंतर’ (अथवा ‘social distancing’) राखणे गरजेचे आहे, तसेच हात साबणाने स्वच्छ धुण्याला व आपला परिसर स्वच्छ ठेवण्याला देखील तेवढेच महत्व आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: